Corona viruse : गावाच्या सीमा बंद

कोरोना विषाणूचा वाढता धोका पाहता खबरदारीचा उपाय म्हणून अनेक शहरवासीयांनी गावाचा रस्ता धरला आहे. त्यामुळे मागील काही दिवसांत गावात येणाऱ्यांची संख्या प्रचंड वाढली आहे. मात्र, या लोकांमळे हा आजार आपल्या गावात पसरू शकतो या भीतीने काही गावांनी आपल्या सीमा बंद करुन घेतल्या आहेत. यापूर्वीच म्हणजे सोमवारी सरकारने राज्यात संचारबंदीसह जिल्ह्यातील सीमाही बंद केल्या आहेत. त्यामुळे अनेकजण जिल्ह्यात अकडून पडलेत. तर, गावकऱ्यांनीही सीमा बंद केल्याने गावातही जाताना अडचण येत आहे. दरम्यान, गावाकडे आलेल्या नागरिकांशी सौजन्यावे वागण्याचं आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानंतर जनता कर्फ्यू पुकारण्यात आला. पण, त्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे सोमवारी दिसलेले चित्र हे चिंता वाढवणारे असेच होते. कारण, मोठ्या प्रमाणात नागरीक घराबाहेर पडले होते. बाईक, कार, रिक्षा यांची संख्या देखील रस्त्यावर मोठी होती. त्यामुळे रविवारी कमावलं के सोमवारी गमावलं असे हे चित्र होते. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात संचारबंदीचा निर्णय घेतला. सोबतच जिल्ह्यातील सीमाही ऐकमेकांसाठी बंद करण्यात आल्या आहेत. यातून अत्यावश्यक सेवा वगळ्यात आल्या आहेत.

गावतही सीमाबंदी
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर शहरी भागासोबतच ग्रामीण भागातही खबरदारीच्या उपाय योजना हाती घेतल्या जात असून कळमनुरी तालुक्यातील नांदापूरच्या गावकऱ्यांनी नवीन व्यक्तींना गावात नो एंन्ट्री केली आहे. याबाबतचा निर्णय सोमवारी गावकऱ्यांच्या बैठकीत झाला आहे. या प्रकारचा निर्णय घेणारे नांदापूर हे राज्यातील पहिलेच गाव आहे. राज्यात कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र खबरदारीच्या उपाय योजना हाती घेतल्या जात आहेत. घरा बाहेर न जाणे, सतत हात धुणे, सॅनिटायझरचा वापर करणे यासह इतर सुचना दिल्या जात आहेत. या शिवाय गर्दीची ठिकाणे टाळण्याच्या सुचनाही दिल्या जात आहेत.

Leave a comment