Corona virus : आता या देशात २ हून अधिक व्यक्तींनी एकत्र येण्यावर बंदी ,खुद्द राष्ट्रप्रमुख गेले एकांतवासातआता

बर्लिन – करोना व्हायरस ने साऱ्या जगात थैमान घातले आहे तर ….या व्हायरस ने आतापर्यंत जगात हजारो लोकांचा जीव घेतला आहे . तर लाखो लोकांना या व्हायरस ची लागण झाली आहे . त्या मुळे कारोना व्हायरस चा प्रसार रोखण्यासाठी जर्मनीने देशात घातलेले निर्बंध अधिक कठोर केले आहेत. या महामारी ला रोखण्यासाठी जर्मनीने 2 पेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्रित येण्यावर बंधन घातले आहेत. BBÇ ने रविवारी जर्मनीच्या च्यांसलार एंजेला मार्केल यांच्या हवाल्याने म्हटले आहे ,की ” आपला व्याहरच संक्रमण रोकण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे ” जर्मनीने घातलेल्या नव्या प्रतिबंध मध्ये ब्युटी – पार्लर ,मसाज पार्लर आदी. बंद आहे .याशिवाय इतर काही आवश्यक नसलेली दुकाने याआधीच बंद केली आहेत.

मर्केल यांच्या संबोधनानंतर ,काही वेळातच एकांतवासात जाणार आहेत,त्या शुक्रवारी एका डॉक्टरच्या संपर्कात आल्या होत्या .त्यांना अँटी न्युमोनियाचे इंजेक्शन देणाऱ्या डॉक्टरांचा कोरोणा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे .त्यामुळे त्यांनी एकांतवास घ्यायचा निर्णय घेतला आहे .

जर्मनीत आतापर्यंत 55 जणांचा मृत्यू

एकांतवास गेलेल्या मर्केल यांची काही दिवस नियमित पणे तपासणी होईल.याकाळात त्या घरूनच सगळी कामे करतील .युरोपातील सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था मानल्या जाणाऱ्या जर्मनीत आता पर्यंत 18,610 जणांना कोरोना ची लागण झाली आहे .त्यापैकी 55 जणांचा मृत्यू झाला आहे.

188 देश कोरोनाच्या कवेत

21 शतकात जग एका भयानक संकटातून जात आहे . कोरोना ने 188 देश्याना कवेत घेतले असून मृतांचा आकडा वाढतच आहे .जगभरात कोरोना ग्रस्तांचा आकडा 3.5 लाखांवर गेला असून 15408 जणांचा मृत्यू झाला आहे .

सर्वाधिक मृतांची संख्या इटली मध्ये

एकट्या इटली मध्ये मृतांची संख्या 5 हजारावर आहे.महत्वाचे म्हणजे ज्या चीन मध्ये ह्या व्हायरस छा जन्म झाला तिथे फक्त सव्वा तीन हजार लोकांचा मृत्यू झाला आहे.

Leave a comment