Corona : Lockdown

कोरोना…लॉक डाउन…अफवा आणि सत्य!

सदर लेख जरा मोठा वाटेल…पण आपण सर्व घरीच आहात तर जरा लक्ष देऊन वाचा!

कोरोना हा व्हायरस तसा फार जुना…म्हणजे 12 वी च्या पुस्तकात त्याचा उल्लेख आहे की आपल्याला एरवी होणारे सर्दी पडस हे दोन विषाणू मुळे होतात, एक ऱ्हाइनो व्हायरस व दुसरा कोरोना व्हायरस… मग आज पर्यंत सामान्य असलेला हा विषाणू इतका घातक कसा झाला? आणि त्याबद्दल जगाची वैद्यकीय परिस्थिती काय आहे? चला जाणून घेऊ…

प्रत्येक जीवाश्मप्रमाणे विषाणूची देखील उत्पत्ती( evolution/ mutation) होत जाते. आता जगात थैमान घातलेला covid – 19 हा त्या उत्पत्ती च्या चौथ्या साखळीतला आहे! ह्या आधी कोरोनाच्या तीन साखळ्या आपल्याला माहीत होत्या, ज्या सौम्य स्वरूपाच्या होत्या आणि anti viral vaccine देऊन आपण त्याला बरं देखील करत होतो. मात्र आता उदभवलेली साखळी ही पूर्णपणे वेगळी व शक्तीशाली आहे, त्याचे स्वरूप ( structure) सध्या तरी जिवशास्त्रज्ञांना माहीत नाही! कोणत्याही व्हायरल आजाराची जेव्हा लस आपल्याला दिली जाते तेव्हा त्यात तोच व्हायरस मृत अवस्थेत आपल्या शरीरात inject केला जातो… जेणेकरुन तो मृत व्हायरस शरीरातील जिवंत व्हायरसची सर्व शक्ती निकामी करून आपल्या प्रतिकार शक्तीला हातभार लावते! आता ह्या व्हायरस वर औषध बनवण्यासाठी सर्वात मोठी अडचण म्हणजे ह्या व्हायरसचे स्वरूपच सध्या आपल्याला माहीत नाही कारण हा पूर्णतः नव्या जोमाचा आहे आणि जुन्या व्हायरस पेक्षा वेगळा आहे. त्यात भर म्हणून ह्याच्या प्रसाराचा वेग हा अतिशय तीव्र आहे… म्हणून हा रोग जगाला त्रासदायक ठरत आहे. शास्त्रज्ञांना ह्या रोगावर आज जरी उपाय सापडला तरी अनेक वेगळे वेगळे टेस्ट करत मानवाच्या वापरासाठी युक्त व्हायला अजून एक वर्ष किमान लागेल! त्यामुळे सद्यस्थितीत आपण केवळ ह्याच संक्रमण रोखू शकतो एवढंच. मागच्या काही दिवसात भारतात अनेक रुग्ण बरे देखील झाले… मात्र तो परत त्यांना उदभवणार नाही याची खात्री नाही! त्यामुळे त्या रुग्णांना सक्तीने quarantine व्हायला सांगितले आहे!

वैद्यकीय पैलू पाहिल्यानंतर आपण आता प्रशासनिक उपाययोजना बघूया!

देशात व राज्यात लॉक डाऊन करण्यात आलेले आहे! पंतप्रधानांनी जनता कर्फ्यु चे आवाहन केले… ह्या मागचे हेतू आपण तपासून पाहूया…

जनता कर्फ्यु वेळी अनेक अफवांना उधाण आले. त्यातून भारतीय जनता अजूनही शिक्षित अडाणी असल्याचे उघड झाले! अवकाशातून फवारणी, 12 तास व्हायरसचे जीवन असते, ओमकार व शंख नाद हा व्हायरस ला मारून टाकतो अश्या अनेक अफवा दिवसभर सोशल मीडिया वर फिरत होत्या, ह्यातली एकही बाब खरी नाही!

जनता कर्फ्यु हा मुळात ह्या साठी आवाहन करण्यात आले होते की लोकांना आणि प्रशासनाला अंदाज यावा की भविष्यात जेव्हा काही दिवसात आणीबाणी येऊ घातली आहे त्यावेळी आपण पुढचे काही आठवडे घरात बंदिस्त राहू शकतो का? एकप्रकारे हा जनता कर्फ्यु म्हणजे भविष्यातील आणीबाणीची रंगीत तालीम होती!! आता वळूयात लॉक डाउन कडे…
राज्यात व देशात लॉक डाऊन का केलं आहे? तर ह्याच कारण असं आहे की जगभरात ज्या देशांमध्ये हा आजार फोफावला त्यात एक गोष्ट समान होती ती म्हणजे आजाराची सुरुवात झाल्यापासून 30 दिवसानंतर पुढच्या आठवड्यात ह्या रोगाचा अचानक पणे गुणाकार होत गेला! आधी एक एक ने वाढलेले रुग्ण आता दोन, चार, आठ, सोळा अश्या पटीने वाढत गेले… भारतात कोरोनाला 30 मार्च रोजी एक महिना पूर्ण होत आहे! त्यापुढच्या आठवड्यात जी आणीबाणी येऊ घातली आहे त्यासाठी सर्व प्रशासनिक यंत्रणा ह्या मोकळ्या असाव्यात, तत्पर असाव्यात व त्यांची ऊर्जा इतर ठिकाणी खर्ची जाऊ नये म्हणून सर्व जनतेला घरात बंदिस्त होण्याचे आदेश देण्यात आले! ज्यावेळी हा रोग फोफावेल तेव्हा त्या रुग्णांना नेणाऱ्या अम्ब्युलन्स कुठेही अडकू नये म्हणून रस्ते मोकळे करण्यात येत आहेत! त्या वाढलेल्या रुग्णांचा इतरांशी संपर्क रस्त्यात येऊ नये म्हणून सगळ्यांना घरी बसवण्यात येत आहे! प्रशासन कोणतीही गोष्ट उघड पणे जाहीर करणार नाही! तुम्ही घाबरून जाऊ नये म्हणून… मात्र सुज्ञ नागरिकांना त म्हणता तपेल कळलं पाहिजे! उद्या जेव्हा हा रोग फोफावेल आणि तुम्ही रस्त्यावर फिरत असाल, पोलीस यंत्रणा तुमच्यात गुंतलेली असेल, अधिकारी त्यात गुंग असतील तर मग ह्या परिस्थितीवर नियंत्रण कोण मिळवणार? रविवारी केलेला शंखनाद हा 30 मार्च पासून कोरोनासोबत सुरू होणाऱ्या युद्धाचा बिगुल होता!! आणि हे प्रतीक होतं की आम्ही तयार आहोत! आम्ही आमच्या वैद्यकीय सेवा देणाऱ्या आणि प्रशासनाच्या पाठीशी आहोत!! तू हे…तू येणारच…आम्ही पण तयार असणारच!

अफवांना बळी पडू नका! रस्त्यावर बाहेर निघू नका! यंत्रणेवर ताण देऊ नका! निरोगी रहा जिवंत रहा! 🙏🙏🙏🙏

Leave a comment